नवी दिल्ली – केंद्र सरकारने आता एक नवीन अॅप लॉन्च केले आहे. ज्याच्या मदतीने रेशन घेण्यासाठी मोठ-मोठ्या रांगेत उभा राहण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईलच्या माध्ममातून रेशन बुक करु शकता. कारण केंद्र सरकारनकडून रेशनकार्ड धारकांसाठी मेरा रेशन अॅप नावाचे अॅप सुरु करण्यात आले आहे. हे वन नेशन वन राशन कार्ड योजनेचा भाग आहे. चला तर मग जाणून घेऊया घरबसल्या तुम्ही कसे रेशन बुक करु शकता.
मेरा रेशन अॅप कसे डाउनलोड करायचे आणि वापरायचे ?
1. सर्वात पहिल्यांदा गुगल प्ले स्टोरवर जा.
2 .त्यानंतर सर्च बॉक्समध्ये मेरा रेशन अॅप सर्च करा.
3. मेरा रेशन अॅपला डाउनलोड आणि इंस्टॉल करा.
4. मेरा रेशन अॅप ओपन करा.
5. आपल्या रेशन कार्डची अचूक माहिती नोंद करा.
मेरा रेशन अॅपचे फायदे
> प्रवासी लोकांना सर्वाधिक फायदा होईल.
> या अॅपद्वारे तुम्हाला रेशन दुकानाची अचूक माहिती मिळेल.
> रेशनकार्ड धारकदेखील त्यांच्या सूचना सामायिक करू शकतात.
> रेशन घेण्याशी संबंधित सर्व माहिती सापडेल.
> कार्ड धारकांना मिळालेल्या धान्यांविषयी माहिती मिळू शकेल.
> रेशन सर्वांना सहज उपलब्ध होईल.
आपल्या जवळचे दुकान देखील शोधू शकता
मेरा रेशन अॅपच्या मदतीने, टायप करून वापरकर्ते जवळच्या वाजवी किंमतीचे दुकान शोधू शकतील. या व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना त्यांच्या पात्रतेचा तपशील आणि अलीकडे केलेल्या व्यवहाराचा तपशील देखील पाहता येईल. सध्या हे अॅप हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. परंतु लवकरच अन्य 14 भाषांमध्येही हे उपलब्ध होईल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या अॅपवरून तुम्ही कोणत्या दुकानातून रेशन कधी व कोणत्या दुकानातून घेण्यात आले याचीही माहिती मिळणार आहे.
कोणत्या लोकांना मिळणार फायदा?
हे अॅप सादर केल्यानंतर अन्न सचिव सुधांशु पांडे म्हणाले की, नवीन मोबाइल अॅपचा उद्देश एनएफएसएच्या लाभार्थी, विशेषत: स्थलांतरित लाभार्थी, फेअर प्राइस शॉप किंवा रेशन शॉप विक्रेते आणि अन्य भागधारकांमध्ये ओएनओआरसीशी संबंधित सेवा प्रदान करणे आहे जेणेकरून ते सोयीचे होईल.