‘आता फक्त 48 तास…’ भाजप नेत्याचे ट्विट चर्चेत

मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय गदारोळात शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या फ्लोअर टेस्टसाठी संपूर्ण आराखडा तयार केला आहे. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (मविआ) सरकारच्या विरोधात विधानसभेत फ्लोर टेस्टसाठी मी गुरुवारी मुंबईला जाणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले आहे.
आता फक्त ४८ तास…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 29, 2022
तर दुसरीकडे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांना गुरुवारी सकाळी ११ वाजता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची फ्लोअर टेस्ट घेण्यास सांगितले आहे. यावरून आता भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी एक सूचक ट्विट केले आहे की,’आता फक्त 48 तास…’ असं लिहत भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान,संजय राऊत यांनी पत्रकरांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले,’मोदींनी आणलेल्या राफेल विमानाच्या वेगापेक्षाही राजभवनाच्या कार्याचा मोठा वेग आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
ते पुढे म्हणाले,’११ तारखेपर्यंत त्यावर निर्णय होणार नाही. यादरम्यान असं काही घडलं, तर सर्वोच्च न्यायालयाने दाद मागण्याची मुभा दिली आहे. अशात राजभवन आणि भाजपा मिळून संविधानाच्या चिंधड्या उडवत असेल, तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करावा लागेल.’ असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.





