करोना व्हायरस यांव केल्याने मरेल आणि त्यांव केल्याने जगेल असे सर्वजण बोलत असतात. मात्र, करोना व्हायरस किंवा कोणताही व्हायरस कशानेही मरू शकत नाही. कारण व्हायरस हा सजीव नसतोच. व्हायरस हा एक बायो पार्टिकल म्हणजे जैविक कण आहे. जसे शिंपल्यात एक वाळूचा कण गेल्यावर शिंपल्यातलेच मटेरीयल वापरून त्याचा मोती बनतो, तसेच कोणत्याही पेशीत हा व्हायरस नावाचा कण गेला की, त्याच्या अनेक कॉपी तयार होतात. ज्या पेशीत तो गेला आहे ती पेशीच त्याच्या खूप साऱ्या कॉपी तयार करते.
दरम्यान , कोरोना व्हायरसमुळे घाबरलेले लोकं धडाधड बाजारातून हँड सॅनिटायजर खरेदी करत आहेत. मात्र हातांची स्वच्छता करण्यासाठी तुम्ही घरीच हँड सॅनिटायजर बनवू शकता. सॅनिटायजर जितकं सुरक्षित सांगितलं जात तितकं ते नसतं. कारण बाजारात मिळणाऱ्या हँड सॅनिटायजरमध्ये अल्कोहल सुद्धा असते. जो काही लोकांच्या त्वचेला सूट करत नाही. अशात घरी बनवलेलं हँड सॅनिटायजर नेहमीच चांगलं राहिल.
यासाठी तुम्हाला विच हेजल एक्सट्रॅक्ट (Witch Hazel Extract), एलोवेरा जेल, एसेंशियल ऑइल ( टी ट्री, पिमपमिंट, लिंबू किंवा लवंग) आणि एक बॉटल हे साहित्य लागणार आहे. सर्वात आधी एका बाऊलमध्ये 2-3 मोठे चमचे एलोवेरा जेल घेऊन ती चांगली मिक्स करा. आता यात काही थेंब विच हेजल एक्सट्रॅक्ट आणि तुमच्या पसंतीचं एसेंशियल ऑइल मिसळा. सर्व साहित्य चांगलं त्यात मिक्स केल्यानंतर एका बॉटलमध्ये भरा. जर तुम्हाला हे स्प्रे फॉर्मेटमध्ये पाहिजे असल्यास त्यात फिल्टर केलेलं थोडं पाणी मिसळा. हवं असल्यास यात व्हिटामिन ई सुद्धा मिसळू शकता. अशा प्रकारे घरीच बनवा हँड सॅनिटायजर …