satara | देशात आता मानव एकतेचा संदेश देण्याची वेळ

पुसेगाव, (प्रतिनिधी) – आज सर्व समाजातील लोकांना आपण असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे भारताची अखंडता व एकात्मता धोक्यात आली आहे. लोकशाही धोक्यात असताना त्याला वाचवणे आणि जिवंत ठेवणे ही जबाबदारी तुमच्या आमच्यावर येऊन ठेपली असून देशात आता मानव एकतेचा संदेश देण्याची वेळ असल्याचे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले केले.
कटगुण, ता. खटाव येथील मलंग बाबा दर्गा येथे अखिल भारतीय मानव एकता सेवा समितीच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, धीरज महाराज शास्त्री, सरपंच जयदीप गायकवाड, दर्ग्याचे मठाधिपती रहमान शहा बाबा, स्वानंद महाराज, शफिकुल बाबा,
माजी सरपंच हनुमंतराव गायकवाड, मनोज देशमुख, भाई मुल्ला, डॉ.आमिर मुजावर, डॉ.सविता वाघ, पोलीस पाटील जयश्री गोरे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल देवकर, बाळासाहेब देवकर, सादिक मनेर, युनूस मुल्ला, अश्फाक शेख, सलीम शिकलगार, मधुकर मोरे, एम.पी गुरव, आदींची होती.
आमदार शिंदे म्हणाले, ज्या समाजाने आपल्यावर विश्वास ठेवला त्यांना बरोबर घेऊन जाणे हे आपले पहिले कर्तव्य असते. त्याच वेळी कोणतीही जाती, धर्माचा दुसरा सर्वांना एकत्र घेऊन तसेच विचारांचे आदान प्रदान करून पुढे कसे जाता येईल हे बघणे महत्त्वाचे आहे. सध्याची देशातील परिस्थिती पाहता पुन्हा नव्याने आपल्याला नवीन लढाई उभी करण्याची गरज आहे. लोकशाही जिवंत ठेवायचे असेल तर समोर येणाऱ्या संकटाला करत एकतेच्या बळावर समाजातील काही विघ्नसंतोषी लोकांना बाजूला ठेवून कार्य करण्याची खऱ्या अर्थाने आता वेळ आली आहे.
येथील अखिल भारतीय मानव एकता समितीच्या वतीने गेल्या कित्येक वर्षापासून राबवण्यात येणारा हा उपक्रम सर्वांना आदर्शवत असून प्रत्येकाने मानव एकतेचा संदेश येथून जाताना घेऊन जावा आणि सामाजिक भाईचारा आणि एकता व ऐक्य टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत.
धीरज महाराज शास्त्री म्हणाले, समाजा समाजात भांडण लावण्याचे सध्या सुरू असलेले प्रयत्न आणि प्रत्येक समाजाच्या धर्मगुरूंचे केले जात असलेले वाटप ही प्रवृत्ती समाजाच्या उद्धारासाठी या संतांनी काम केले त्या संतांचे कार्य डोळे समोर ठेवून जगाची कल्याणासाठी सर्वांनी पुन्हा एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. संत हे सर्वांच्याच कल्याणासाठी कार्यरत होते. निष्ठा एखाद्या प्रति असेल त्याच्या पायावर नतमस्तक होऊन त्यांची प्रामाणिकपणे सेवा करा.
यावेळी मलंग बाबा यांच्या उरूसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा तसेच निबंध स्पर्धामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या स्पर्धकांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. मधुकर मोरे यांनी प्रास्ताविक केले. एम.पी गुरव यांनी आभार मानले





