मुंबई – दक्षिण भारतातील सुपरहिट फिल्म “विक्रम वेधा’चा हिंदी रिमेक लवकरच बनवला जाणार आहे. या सिनेमामध्ये हृतिक रोशन असणार आहे ही गोष्ट आता निश्चितच झाली आहे. हृतिक या सिनेमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे.
या सिनेमात हृतिक डबल रोलमध्ये असेल, त्याचा एक रोल नेहमीप्रमाणे स्टायलिश, हॅंडसम आणि डॅशिंग असेल तर दुसरा रोल अतिशय खतरनाक गैंगस्टरचा असेल. या सिनेमाचे डायरेक्शन पुष्कर गायत्री करणार आहेत. त्यांनीच ओरिजनल सिनेमा दिग्दर्शित केला होता.
हृतिकला नेहमीच नवीन नवीन चॅलेंज घ्यायला आवडते. त्यानुसार त्याने या सिनेमात परस्परविरोधी व्यक्तिरेखा साकारण्याचे चॅलेंज स्वीकारले आहे.”विक्रम वेधा’ साठी अगोदर आमीर खानची निवड करण्यात आली होती.
मात्र त्याच्या बरोबरची बोलणी फिसकटली आणि हृतिकचे नाव निश्चित झाले. हृतिक बरोबर सैफ अली खान देखील या सिनेमात असणार आहे. हृतिक बाबत एक तक्रार नेहमी केली जाते ती म्हणजे तो फारच कमी सिनेमे करतो. पण आता त्याने 2021 वर्षासाठीचे आपले वेळापत्रक निश्चित करून टाकले आहे, “वॉर 2′,”फायटर’,”क्रिश 4′ आणि विक्रम वेधाचा रिमेक हे सिनेमे त्याच्याजवळ आहेत.