deva movie trailer : आता सगळ विसरा कारण मार्किटमध्ये आलाय ‘देवा’; सिनेमाचा ट्रेलर रिलीज, शाहिदाचा खतरनाक लूक पाहिलात का?

बॅालीवूडचा अभिनेता शाहिद कपूर कबीर सिंग या त्याच्या ब्लॅाकब्लस्टर सिनेमानंतर देवा सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. देवा या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये शाहिद अॅक्शन करताना दिसत आहे. येत्या ३१ जानेवारीला देवा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज होणार असून या सिनेमाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांच्या मनात सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
झी स्टुडिओज आणि रॉय कपूर फिल्म्स निर्मित, हा सिनेमा एका रोमांचक सिनेमॅटिक प्रवासाची सुरुवात होणार असल्याचे दर्शवितो. शाहिद कपूरने या सिनेमात देव आंब्रे या पोलीस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारलेली आहे. या ट्रेलमधील शाहिदचे ॲक्शन आणि जबरदस्त स्टंट्स पाहून चाहते थक्क झाले आहेत. देवा हा सिनेमा फुल ॲक्शनपॅक सिनेमा असणार आहे. शाहिदसोबत पूजा हेगडेही मुख्य भूमिकेत असणार आहे.
याशिवाय सिनेमात कुब्बरा सेट आणि पावेल गुलाटी आणि प्रवेश राणा सारखे दिग्गज कलाकारही आहेत. गुंतागुंतीची पात्रे आणि एक रोमांचक कथेसह, देवा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलमधून सिनेमातील उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचे झलक दिसते. एकीकडे मोठे ॲक्शन सीन आणि दुसरीकडे पात्रांची भावनिक असेलेली गुंतागुत या ट्रेलमध्ये दाखवण्यात आली आहे. कबीर सिंग या सिनेमाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. यामुळे देवा हा शाहिदचा नवा सिनेमा प्रेक्षकांना आवडतो ते पाहणे महत्वाचे असणार आहे.





