आता दिल्लीला टोळधाडीचा धोका

नवी दिल्ली – दिल्लीला असलेल्या संभाव्य टोळधाडीचा धोका पाहता सरकारने दक्षिण आणि उत्तर जिल्ह्यात हाय अलर्ट जाहीर केला आहे. या संदर्भात महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विकास सचिव, डिव्हिजनल कमिशनर, डायरेक्टर एग्रिकल्चर, डीएम साऊथ दिल्ली, डीएम वेस्ट दिल्लीत उपस्थित होते.
दिल्ली सरकारने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सल्ला दिला आहे की, टोळधाडीला परतवून लावण्यासाठी मोठमोठ्या आवाजाचा, डीजेचा वापर करण्यास सांगितले आहे. एवढंच नव्हे तर फटाखे लावून त्यांना घालवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कडूनिंबाची पाने पेटवण्याची देखील सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत आता टोळधाडीची जी तुकडी आहे. ती खूप छोटी तुकडी आहे. दिल्ली सरकार संपूर्ण परिस्थितीची देखरेख करत आहेत. साऊथ दिल्ली आणि दिल्लीच्या इतर भागात अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
हवेचा स्त्रोत पाहता दक्षिणेकडे वारा वाहत आहे. जर हवेत काही बदल होत असेल तर त्याकडे लक्ष दिले जात आहे. त्यामुळे दिल्लीत टोळधाड येईलच, असे निश्चितपणे सांगता येत नाही.





