वाडेबोल्हाईतील त्या बांधकामांना धाडल्या नोटिसा

सरपंच दीपक गावडे यांची माहिती

वाघोली (पुणे) – वाडेबोल्हाई (ता.हवेली) येथील ग्रामपंचायत हद्दीत शासकीय, गायरान जागेत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांना ग्रामपंचायतीच्यावतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अशी माहिती सरपंच दीपक गावडे यांनी दिली आहे.

 

वाडेबोल्हाई परिसरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गुंठेवारी व्यवसाय जोमात सुरू आहे. या जागेत उभी राहात असलेली अनेक बांधकामे अनधिकृत आहेत. तसेच ग्रामपंचायत हद्दीत इतर शासकीय, गायरान जागेवर सुरू असलेल्या बांधकामावर ग्रामपंचायतीच्या वतीने नोटिसा बजावण्यात येत आहेत, त्यामुळे अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने जवळपास एक महिन्याच्या कालावधीत 50 अनधिकृत बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने ही बांधकामे निष्कासित करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती सरपंच दीपक गावडे यांनी दिली.

 

  • गोरगरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन ज्या प्रमाणे प्रयत्न करत आहे, त्याचप्रमाणे संबंधित नागरिक देखील एक गुंठा जागा खरेदी करून आपले
    घराचे स्वप्न पूर्ण करत आहे. अनाधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी शासन पाठपुरावा करत आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामावर ग्रामपंचायतीने कारवाई करू नये.
    – नीळकंठ केसवड, सामाजिक कार्यकर्ते

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.