पिंपरी, दि. 28 (प्रतिनिधी) –पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील डॉक्टरासंह कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणा तपासणी पथकाच्या पाहणीत समोर आला आहे. 76 डॉक्टरांनी हजेरीपत्रकावर सहीच केली नसल्याचे तसेच 2 डॉक्टरांनी ओळखपत्र आणि 4 डॉक्टरांनी ऍप्रन परिधान केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना तपासणी पथकातर्फे नोटीसा देण्यात येणार आहेत.
महापालिकेचे संत तुकारामनगरमध्ये 750 खाटांच्या क्षमतेचे वायसीएम सर्वात मोठे रुग्णालय आहे. शहरासह जिल्ह्यातील विविध भागातील रुग्ण या रुग्णालयात उपचारांसाठी येत असतात.