फुलांच्या वर्षांवासह नोटांचे घातले हार
नवी दिल्ली – देशभरात करोबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सर्व जण सुरक्षित राहावे यासाठी डॉक्टर, पोलीस आणि सफाई कर्मचारी जीवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पडत आहे. अशातच पंजाबमध्ये स्तुत्य व्हिडीओ सध्या समोर येत आहेत. हा व्हिडीओ पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनीही स्वतःच्या ट्विटरवर शेअर केला आहे.
एकीकडे डॉक्टरांना घरातून बाहेर काढण्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. तर पंजाबमधील नाभा परिसरातील नागरिकांनी स्वच्छता कर्मचाऱ्यावर फुलांचा वर्षाव करत टाळ्या वाजवत आहेत. तसेच त्या कर्मचाऱ्याला नोटांच्या माळा घालून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
#WATCH Punjab: Residents of Nabha in Patiala applauded sanitation workers by clapping for them and showering flower petals on them. Some even offered garlands of currency notes to one of the workers. #COVID19 (31-3-2020) pic.twitter.com/238f6oBlWn
— ANI (@ANI) March 31, 2020