कोणी काहीही म्हणो.. आजचा भारत बंद अयशस्वी – रामदास आठवले

Updated On:

कोल्हापूर (प्रतिनिधी) – देशभर सुरू असणारा भारत बंद अयशस्वी झाला आहे. भारत बंदला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही, त्यामुळं कोणी काहीही म्हणो.. आजचा भारत बंद ( Bharat Bandh ) अयशस्वी झाला असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale ) यांनी कोरोना काळात कोल्हापूर जिल्ह्यात मृत्युमुखी पडलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या 13 कार्यकर्त्यांच्या कटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी दोन दिवस कोल्हापूर दौरा आयोजित केला होता. दौऱ्या दरम्यान कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी सध्या देशभर सुरू असणारे शेतकरी आंदोलन हे राजकारण प्रेरित आहे. केंद्र सरकारने लागू केलेले शेतकरी बिल पूर्णपणे माघे घेता येणार नाही. मात्र, शेतकरी नेत्यांनी सरकारच्या चर्चेच्या मागणीला प्रतिसाद देऊन या बिलात काही सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या सूचनांना सरकार सकारात्मक प्रतिसाद नक्की देईल. भारत बंदला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही.  आजचा भारत बंद अयशस्वी झाला असही आठवले यावेळी म्हणाले.

आणखी संबंधित बातम्या

Ramdas Athawale : ‘ज्ञानेश कुमार यांनी कोणाच्याही दबावाखाली राजीनामा देऊ नये’; रामदास आठवलेंचे विधान

2026-09-28 10:52:36

Ramdas Athawale : ‘ज्ञानेश कुमार यांनी कोणाच्याही दबावाखाली राजीनामा देऊ नये’; रामदास आठवलेंचे विधान

Ramdas Athawale : मी आरक्षण सोडण्यास तयार, पण.. ; रामदास आठवले यांचं मोठं वक्तव्य

2026-09-10 16:12:50

Ramdas Athawale : मी आरक्षण सोडण्यास तयार, पण.. ; रामदास आठवले यांचं मोठं वक्तव्य

Ramdas Athawale : "आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा" - रामदास आठवले

2026-08-24 17:58:27

Ramdas Athawale : "आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा" - रामदास आठवले

Newasa News : नेवाशात मोठी राजकीय घडामोड; आमदार लंघे-पाटलांना आठवलेंचा भक्कम पाठिंबा!

2026-08-24 17:06:50

Newasa News : नेवाशात मोठी राजकीय घडामोड; आमदार लंघे-पाटलांना आठवलेंचा भक्कम पाठिंबा!

Ramdas Athawale : केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा दावा

2026-08-17 21:18:05

Ramdas Athawale : केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा दावा