Pune District : हरलेलो नाही, पुन्हा ताठ मानेने उभा राहील – माजी आमदार मोहिते

राजगुरुनगर : मी हरलेलो नाही, मी पुन्हा ताठ मानेने उभा राहील, राजकारणातील यश आणि अपयश हे पचवण्याची हिम्मत दिलीप मोहिते यांच्यात आहे. मी परत उभारी घेईन. जिथं चुकले ते दुरुस्त करील, असा विश्वास खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिला.
राजगुरूनगर शहरात माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून नुकतेच बालजत्रा व खाऊ गल्ली जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, तहसीलदार ज्योती देवरे, जिल्हा परिषद माजी सदस्य सुरेखा मोहिते पाटील, अनिल राक्षे, मंगल चांभारे, भाजप चे तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुका युवक अध्यक्ष वैभव घुमटकर, शहराध्यक्ष सागर सातकर, विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, संतोष भांगे, पप्पू बनसोडे, हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर, माजी अध्यक्ष अॅड. मनिषा टाकळकर, अॅड. सुनील वाळुंज, बाजार समितीचे माजी उपसभापती विठ्ठल वनघरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मोहिते पाटील म्हणाले, नुकत्याच निवडणूक झाल्या आपल्याला अपयश आले अनेक कार्यकर्त्यांच्या मनात काही भावना होत्या असे कार्यक्रम होतील की नाही याबाबत शंका होत्या; मात्र जेजे आपण करणार आहोत ते नक्की केले जाणार आहे असा कार्यकर्त्यांना त्यांनी शब्द त्यांनी दिली. खंत एकच आहे, तालुक्याला मंत्रिपदाची संधी होती. 75 वर्षांनी मंत्रिपदाची तालुक्याला संधी मिळणार होती. त्यातून तालुक्याचा अधिकचा विकास करता आला असता, असे त्यांनी नमूद केले.
त्यावेळी 10 वर्षे आपण मागे जातो
ज्यावेळी सत्तेतपासून तालुका दूर राहतो त्यावेळी 10 वर्षे आपण मागे जातो. माझ्या मनात अनेक कल्पना होत्या, कार्यकर्त्यांच्या कल्पना होत्या; मात्र त्या कल्पना साकार करण्याची संधी आपण गमावली आहे. शेवटच्या एक दिवसात दामा जी पंतांनी घोटाळा केला एक दिवसाची संधीने पाच वर्षांची सजा तालुक्याला मिळाली अशी खंत व्यक्त करून पुढे अनेक निवडणूक आहे यात सर्वानी भविष्याचा निर्णय घ्यावा असे आवाहन मोहिते पाटील यांनी केले. या कार्यक्रमात वन संरक्षणासाठी काम करणार्या राजगुरुनगर येथील सपना राठोड याना विशेष पुरस्कार देऊन माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. राजगुरुनगर मध्ये नुकतीच दोन लहान चिमुकल्या मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या झाली त्या दोन्ही चिमुकल्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव घुमटकर यांनी तर सूत्रसंचालन योगिता पाचारणे यांनी केले.
वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे
वाडा रस्त्यावर रस्त्याची रुंदी वाढवली, काँक्रीटीकरण केले. लोकांना बसण्यासाठी व्यवस्था केली मात्र आता त्याच रस्त्यावर लोकांनी पार्किंग आणि टपर्याटाकून अतिक्रमण केले आहे. शहरातील नागरिकांनी अशा लोकांसाठी केलेल्या गोष्टीसाठी एकत्र आले पाहिजे. शहरात वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे अतिक्रमण बाजूला केले पाहिजे. असेही मोहिते यांनी यावेळी नमूद केले.
नागरिक सहपरिवार सहभागी
मध्यवर्गीय नागरिकांना 31 डिसेंबर साजरा करता येईल असे नाही, म्हणून खाऊ गल्ली आणि बालजत्रेचे आयोजन करून सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत या कार्यक्रमाचे आयोजन केले. यात अनेक कुटुंबे सहपरिवार सहभागी झाले. खाऊ गल्लीत जवळपास 60 पेक्षा जास्त स्टॉल बचतगट आणि महिलांनी उभारले. याशिवाय बाल जत्रेत विविध खेळणी पाळणे, पाण्याचा तलाव होड्या, रेल्वे, लहान मुलांची खेळणी आदी चीज वस्तूचा बालचमूंनी आनंद घेतला. यातून महिलांना मोठी आर्थिक कमाई झाली. शैलेश लोखंडे यांच्या अभिमान महाराष्ट्राचा या कार्यक्रमाने सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमात 25 महिलाना पैठणी तर 500 महिलांना साडीचे बक्षीस मिळाले.





