फिटनेस फिक्र म्हणून ओळख असणारा मिलिंद सोमण न्यूड फोटोशूटमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या फोटोशूटमुळे अडचणीत आला असतानाच मिलिंदने आता एक नवीन फोटो शेअर केला आहे. या फोटोतील लूकमुळे पुन्हा एकदा मिलिंद चर्चेचा विषय बनला आहे.
मिलिंद सोमणने शेअर केलेल्या फोटोमध्ये चेहऱ्यावर रंग, डोळ्यात काजळ आणि नोजपिन असा लूक आहे. या फोटोविषयी सांगताना मिलिंद म्हणतो कि, गेल्या एकही दिवसांपासून मुंबईजवळील कर्जत याठिकाणी घालवले. आता चेन्नईला जात आहे, लवकरच याबद्दल सांगेल, असे त्याने कॅप्शनमध्ये लिहले आहे. मिलिंदच्या आगामी प्रोजेक्टसाठीचे हे फोटोशूट असून त्याची घोषणा लवकरच होणार आहे.
दरम्यान, मिलिंद सोमणने आपला ५५ व्या वाढदिवसानिमित्त आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तो न्यूड होऊन धावताना दिसला होता. या फोटोसह त्यानं ‘हॅपी बर्थ डे टू मी’ असं त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात झाली आहे.