नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा : आनंदला तिसरे स्थान
Updated On:

स्टॅव्हेंगर (नॉर्वे) – माजी विश्वविजेता, भारताचा ग्रॅंडमास्टर विश्वनाथ आनंदने नवव्या आणि अंतिम फेरीत आर्यन तारीवर विजय मिळविला. या विजयासह त्याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत तिसरे स्थान पटकविले. तसेच जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनने विजेतेपदावर नाव कोरले.
52 वर्षीय आनंदने तारीविरुद्धचा सामना 22 चालींच्या बरोबरीत सोडवल्यानंतर जिंकला. आनंदला सडन डेथ टायब्रेकमध्ये कठोर परिश्रम घ्यावे लागले. या विजयासह त्याला 14.5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत आनंदने पहिल्या तीन फेरीत विजय मिळवित शानदार सुरूवात केली. यानंतर कार्लसनवरही प्रभावी विजय मिळविला. परंतु पाचव्या फेरीनंतर त्याला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. आठव्या फेरीत मामेदयारोव्हकडून झालेल्या पराभवामुळे त्याला आघाडी गमवावी लागली.

