नोरा फतेहच्या डेटिंगची चर्चा; सोशल मीडियावर फोटो व्हायरल, फोटोत दिसणारी ती व्यक्ती कोण?

Nora Fatehi : अभिनेत्री नोरा फतेही तिच्या आकर्षकपणा आणि अनोख्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत असते. आजकाल ती द रॉयल्स या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. नुकतेच तिचे एका व्यक्तीसोबचे फोटो व्हायरल झाल्यामुळे तिच्या डेंटिंगच्या बातम्यांना वेग आला आहे.
२७ मे २०२५ रोजी एका अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्समध्ये नोरा फतेहीने नृत्याचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनी तिच्या नृत्याचे कौतुक केले. तिने सादर केलेल्या अनोख्या नृत्य शैलीने सर्वाचे लक्ष तिने आपल्याकडे वेधून घेतले होते.
दरम्यान, अभिनेत्री नोरा फतेह अमेरिकन गायक बेन्सन बूनसोबत दिसली. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये हे दोघेही दिसत आहेत. फिल्मफेअरच्या मते, या दोघांमधील जबरदस्त केमिस्ट्री असून दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून गेले होते. यामुळे नोराच्या डेेटिंगच्या चर्चांना उधान आले आहे.
बेन्सन बून हा एक अमेरिकन पॉप गायक आहे. २०२१ मध्ये अमेरिकन आयडॉलमध्ये सहभागी झाल्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. पण त्याला सोशल मीडियाद्वारे लोकांशी जोडले जायचे होते, म्हणून त्याने शो सोडला. नंतर तो टिक टॉककडे वळला. या माध्यमाने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. वर्षभरापूर्वी बून टेलर स्विफ्टच्या इरास टूरसाठी ओपनिंग अॅक्ट सादर केला होता. त्याने अनेक लाईव्ह आणि लेट शोमध्ये आपल्या गायनाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.





