बीचच्या थंड पाण्यात Nora Fatehi ची मस्ती ! यॉटवरील डान्स video viral

मुंबई – अभिनेत्री नोरा फतेही आपल्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये नोरा अनेकदा बीचवर पार्टी केल्यामुळे चर्चेत आली आहे.आताही नोराचा बीचवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नोराने स्वतः आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये नोरा समुद्र किनाऱ्यावर व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.
यादरम्यान नोरा यॉटवर उपस्थित असलेल्या तिच्या फ्रेंडसोबत डान्स करतानाही दिसत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या जबरदस्त डान्स मूव्ह्स पाहून चाहते पुन्हा एकदा अभिनेत्रीच सोशल मिडीआयवर कौतुक करत आहेत.या व्हिडिओमध्ये नोराचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.व्हेकेशनवर असलेल्या नोराचा पार्टी डान्स पाहून चाहते चांगलेच खुश झाले आहेत.
View this post on Instagram
नोरा नेहमीप्रमाणे शॉर्ट ड्रेससह केसांची बन स्टाईलकरून यॉटवर मस्ती करताना दिसून आली. यावेळी नोराने तिच्या मित्रांसह विवध वॉटर ऍक्टिव्हिटी केल्याचे व्हिडिओत दिसून येते. एक दर्जेदार डान्सर असण्यासोबतच अभिनेत्री अनेक रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून देखील दिसून येते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या थँक गॉड या चित्रपटात देखील नोरा आपल्या किलर अंदाजात दिसली होती.

