पुणे –करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम शनिवारी बंद राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहीम विस्कळीत झाली आहे.
गेल्या 15 दिवसांपासून लसीकरण मोहीम पूर्ण क्षमतेने सुरू नाही. लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहीम महापालिकेतर्फे पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात येऊ शकत नाही.
महापालिकेने जादा लसींची मागणी केली आहे. परंतु, राज्याकडेच लस पुरेशा क्षमतेने येत नसल्याने शहराला लसींचा पुरेसा पुरवठा करता येत नाही. सध्याही तीच परिस्थिती असून, शनिवारी लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.