Gas Shortage : गॅस सिलिंडरच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आता केवळ ऑनलाइनच बुकिंग करावे लागत असून, सिलिंडरही घरपोच दिले जात आहेत. त्यामुळे सिलिंडरसाठी रांगा लागलेल्या नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. घरगुती गॅसचा तुटवडा नाही. मात्र, व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंदच केला आहे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. गॅस सिलिंडरसाठी शहर व जिल्ह्यात रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. हे टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता घरगुती सिलिंडरची मागणी ऑनलाइन आणि वितरण आता केवळ घरपोच पद्धतीने करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर चार दिवसांत गॅस सिलिंडर ग्राहकांच्या घरी पोच करण्यात येणार आहे. गॅस एजन्सी, गोदाम किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून थेट सिलिंडर देण्यास बंदी घालण्यात आली आहे. कुठेही रांगा लावून गॅस सिलेंडर देऊ नयेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. गॅस एजन्सीसमोर गर्दी झाल्यास पोलीस प्रशासनाने तत्काळ मदत करावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयाची अंमलबाजवणी सुरू झाल्यानंतर मंगळवारी रांगा दिसल्या नाहीत. शहरासह जिल्ह्यात एकूण ३८ लाख २३ हजार गॅस जोड आहेत. एचपी, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या २२२ गॅस एजन्सींमार्फत वितरण केले जाते. Pune District : एमआयटीला कायदेशीर भाषेत उत्तर देऊ; संचालक प्रशांत काळभोर यांचा इशारा: कचरा प्रश्नावर ग्रामसभा तहकूब