“भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कोणीही किंमत देत नाही”, भास्कर जाधवांची जहरी टीका

Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Death | शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निधानाबद्दल मोठा दावा केला. ज्यावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही त्यांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर ठेवला होता हे मला त्या डॉक्टरांनी सांगितलं, असा खळबळजनक दावा रामदास कदम यांनी केला.
यावरून आता ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाल्याचे चित्र आहे. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा गटनेते आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांची श्वावानासोबत तुलना करत जहरी टीका केली आहे.
काय म्हणाले भास्कर जाधव?
शिवसेना नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेबांसदर्भात केलेल्या विधानाचा भास्कर जाधवांनी चांगलाच समाचार घेतला. आमदार भास्कर जाधव म्हणाले, “रामदास कदमला मी छमछमदास, बामदास म्हणतो. रामदास कदमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सावली बारमध्ये भXXXXX करून त्यांनी पैसे कमावले आहेत, तो बार बंद झाल्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. रामदास कदमासारखा मूर्ख माणूस संपूर्ण महाराष्ट्रात नाही. कुवत नसलेल्या माणसांकडून टीका सुरू आहे. कदमांसारख्या श्वानांना आपण किंमत देत नाही.”
यावेळी भास्कर जाधवांकडून रामदास कदमांचा उल्लेख ‘बारदास कदम’ असा उल्लेख केला. “एकीकडे आम्ही शिवसेनाप्रमुखांचे भक्त म्हणायचे आणि त्याच शिवसेनाप्रमुखांवर अश्लाघ्य शब्दांत टीका करायची, अशा प्रकारचे हे बारदास कदम, छमछमदास, भXXXXX करणाऱ्यांकडून अशा प्रकारचे उद्गार अपेक्षित असतात. ज्या शिवसेनेने रामदास कदमला 32 वर्षे लोकप्रतिनिधी केले, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होणार नाही, कारण हा कृतघ्न माणूस आहे.”
‘मुंबईसाठी काय केले?’
उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसासाठी काय केले, असं रामदास कदम विचारतात. अरे रामदास कदम २००९ मध्ये तू माझ्याविरोधात पराभूत झाला होता, त्यानंतर तुला मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांमधून विधान परिषदेचा आमदार केला. तू दोन वेळा मुंबईच्या नगरसेवकांमधून आमदार झालास, पण तू मुंबईसाठी काय केले, हे अगोदर सांगावे,” असा सवालही भास्कर जाधवांनी केला.
जाधव यांनी पुढे म्हटले की, “रामदास कदम हे शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना कोणतीही मोठी जबाबदारी सोपवली नाही. शिंदेसेनेला आज तीन वर्षे झाली. पण, या काळात रामदास कदमला महाराष्ट्रातून भाषण द्यायला कोणी बोलावले आहे का? त्यामुळे अशा मेळाव्यांमधून भुंकल्याशिवाय रामदास कदम याच्यासारख्या श्वानांना कोणी किंमत देत नाही. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी त्यांच्याकडून अशी वक्तव्ये सुरू आहेत, असेही जाधव यांनी म्हटले. Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Death |
रामदास कदम यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान
शिंदे गटाच्या मेळाव्यात रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत खळबळजनक माहिती दिल्यानंतर त्यांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. “मी जे बोललो त्यावर उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण करावे. बाळासाहेबांच्या बॉडीचा दोन दिवस छळ केला. मी खोटो बोलतोय तर माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट होऊन जाऊ देत. बाळासाहेब ठाकरेंच्या हातांच्या ठसाचा उपयोग कशासाठी झाला, याबाबत उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं,” असं रामदास कदम म्हणाले. Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Death |
हेही वाचा:
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! पश्चिम महाराष्ट्रातील आमदाराचा मुलगा हाती ‘कमळ’ घेणार





