‘धनुष्यबाण’ चिन्ह शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही – उद्धव ठाकरे

मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी धनुष्यबाण शिवसेनेपासून हिरावून घेऊ शकत नाही, असे म्हटले आहे.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच त्यांनी एक चर्चा सुरु आहे शिवसनेच्या चिन्हाबद्द्ल. कायद्याच्या दृष्टीने बघितलं तर धनुष्यबाण शिवसेनेपासून हिरावून घेऊ शकत नाही. मतदान पत्रिकेवर चिन्हं महत्त्वाचं आहे, पण हे धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची चिन्हं लोकं बघतात, माणूस बघुन मतदान करतात. नवीन चिन्हांचा विचार करत नाही हे मुद्दाहून तुम्हाला सांगत आहे असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी, एक आमदार गेला म्हणून पक्ष संपला का ? आमदार जाऊ शकतात पक्ष जाऊ शकत नाही. हा एक संभ्रम तयार केला जात आहे म्हणून लोकांना सांगत आहे यावर विश्वास ठेवू नका. विधीमंडळ पक्ष वेगळा आणि नोंदणीकृत पक्ष वेगळा. धनुष्यबाण बाबत कोणीही मनात संभ्रम ठेवू नका.
ते १५-१६ आमदार विधीमंडळात आमच्याबरोबर राहीले आहे त्यांचे मला कौतुक आहे. अशी जिगरीची माणसे जिथे असतात तिथे विजय हमखास असतो. माझा न्याय मंदिरावर विश्वास आहे. न्यायदेवतेवर विश्वास आहे. लोकशाहीचे अस्तित्व किती मजबूत रहाणार आहे, देशाच्या पुढच्या वाटचालीला दिशा दाखवणारा उद्याचा निकाल असणार असल्याचे म्हटले.





