‘तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती’
Updated On:

मुंबई – दिल्लीमधील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची अजिबात गरज नव्हती, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
शरद पवार म्हणाले कि, वारंवार टीव्हीवर यासंबंधी बातम्या दाखवून सांप्रदायिक कलह वाढेल अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचं योग्य पालन करा असं आवाहन केलं.
दरम्यान, तबलिगी जमातच्या धार्मिक समारंभामध्ये भाग घेतला होता आणि त्यांची करोनासाठी केलेली टेस्ट “पॉझिटिव्ह’ आली आहे. देशातील कोरोनाचा संसर्ग वाढण्यास तबलिगी कार्क्रम जबाबदार असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होतं असल्याचे निरीक्षण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नोंदवले आहे.





