Hero Moto Corp: पेट्रोल-चार्जिंगची गरजच नाही.! हिरोची जबरदस्त बाईक लॉन्च; किंमत एकदा पाहाच…
Hero Moto Corp या बाईकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे फ्लेक्स-फ्यूल तंत्रज्ञान. ही बाईक केवळ पेट्रोलवरच नव्हे तर इथेनॉल मिश्रित इंधनावरही चालू शकणार आहे. E20 म्हणजे 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोलपासून ते E100 म्हणजे 100 टक्के शुद्ध इथेनॉलपर्यंत कोणतेही मिश्रण वापरण्याची क्षमता या बाईकमध्ये असणार आहे.

Hero Moto Corp: भारतीय दुचाकी बाजारात आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्प आज आपली पहिली फ्लेक्स-फ्यूल बाईक भारतीय बाजारात सादर करत आहे. पर्यावरणपूरक आणि इंधन बचतीवर भर देणारी ही बाईक वाहन क्षेत्रात नवा बदल घडवू शकते, अशी चर्चा सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात सुरू आहे.
कंपनीने अद्याप या बाईकचे अधिकृत नाव, इंजिन क्षमता किंवा इतर तांत्रिक माहिती जाहीर केलेली नाही. मात्र, विविध अहवालांनुसार ही बाईक लोकप्रिय ‘एचएफ डिलक्स’ किंवा ‘स्प्लेंडर’ मॉडेलवर आधारित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या बाईकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे फ्लेक्स-फ्यूल तंत्रज्ञान. ही बाईक केवळ पेट्रोलवरच नव्हे तर इथेनॉल मिश्रित इंधनावरही चालू शकणार आहे. E20 म्हणजे 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोलपासून ते E100 म्हणजे 100 टक्के शुद्ध इथेनॉलपर्यंत कोणतेही मिश्रण वापरण्याची क्षमता या बाईकमध्ये असणार आहे.
इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा स्वस्त आणि पर्यावरणासाठी अधिक सुरक्षित मानले जाते. त्यामुळे या बाईकमुळे वाहनधारकांचा इंधन खर्च कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर कार्बन उत्सर्जनातही घट होऊन पर्यावरण संरक्षणाला हातभार लागणार आहे.

Hero Flex-Fuel Bike Launch
जानेवारी 2025 मध्ये झालेल्या भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये हिरो मोटोकॉर्पने ‘HF Deluxe Flex-Fuel’ या संकल्पनात्मक मॉडेलचे प्रदर्शन केले होते. त्यामुळे आज सादर होणारी बाईक हीच असण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईकपैकी एक असलेल्या ‘स्प्लेंडर’मध्ये हे तंत्रज्ञान आणण्याचीही चर्चा आहे. ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी स्प्लेंडर फ्लेक्स-फ्यूल आवृत्तीत आली, तर हे तंत्रज्ञान अधिक वेगाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकते.
भारत सरकारही इथेनॉलच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करणे, इंधन आयात खर्च घटवणे आणि प्रदूषण कमी करणे या उद्देशाने फ्लेक्स-फ्यूल वाहनांना महत्त्व दिले जात आहे. अशा परिस्थितीत हिरो मोटोकॉर्पची ही नवी बाईक बाजारात मोठा बदल घडवू शकते.
कमी खर्च, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि इंधनाचे विविध पर्याय यामुळे ही बाईक मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकते. आता कंपनी अधिकृतपणे कोणते मॉडेल आणि कोणती वैशिष्ट्ये सादर करते, याकडे संपूर्ण ऑटोमोबाईल क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

