लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कडक
Updated On:

मुंबई – राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी करोना स्थितीवर भाष्य केले आहे. राज्यातील प्रमुख शहरांत ज्या पद्धतीने रुग्णसंख्या वाढत आहे ते पाहाता एकूण महाराष्ट्रातली सध्याची स्थिती स्फोटक आहे. अशा स्थितीत आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून आपण काही निर्बंध लावलेच पाहिजेत, या मताचे मुख्यमंत्री आहेत. आणि ते निर्बंध लावले गेले, असे वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना वडेट्टीवार यांनी संपूर्ण लॉकडाऊनच्या चर्चांवर देखील खुलासा केला. राज्यात काही निर्बंध लागू झाले आहेत. आणि राहिला प्रश्न संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा. तर असा अजिबात कोणताही विचार नाही.
निर्बंध मात्र शंभर टक्के कडक करावे लागतील. पण लॉकडाऊन हा विषय समोर नाहीच. जर तशी परिस्थिती उद्भवली, तर तसा पर्याय आपल्यासमोर आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.



