“अर्थसंकल्पामधून कोणतीही अपेक्षा नाही, आतापर्यंत…”; काँग्रेस नेत्याची बजेट सादर होण्यापूर्वी टीका

Union Budget 2025 | देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या सादरीकरणासाठी आता फक्त काही वेळ उरला आहे. आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी ११ वाजता संसदेत २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थ मंत्रालयात पोहोचल्या आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत अर्थसंकल्पावर शिक्कामोर्बत झाल्यानंतर अर्थमंत्री सीतारमण अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. मात्र अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले, “आम्हाला अर्थसंकल्पाकडून कोणतीही अपेक्षा नाही. ते 10 -11 वर्षांपासून अर्थसंकल्प सादर करत आहेत आणि त्यांनी कोणतीही ठोस काम केलेले नाही. त्यांच्या मित्रांना, मोठ्या भांडवलदारांना दिलासा देण्यासाठी ते काम करत आहेत. दिल्लीत निवडणुका असल्याने ते काही आश्वासनांद्वारे लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करू शकतात,” असे म्हणत संदीप दीक्षित यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे.
#WATCH | Delhi | On #UnionBudget2025, Congress leader Sandeep Dikshit says, “We have no expectations from the budget. They have been presenting it for 10-11 years and have done nothing substantial. We just need to see how many dimensions they brought to give relaxation to their… pic.twitter.com/QZ5p5x1elS
— ANI (@ANI) February 1, 2025
मध्यमवर्गापासून ते उद्योजकांपर्यंत मोठ्या घोषणा होण्याची शक्यता
दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला यश मिळवण्यासाठी यशाची मोठी पराकाष्टा करावी लागली. एक्सिट पोलनुसार देशात भाजपला मोठ्या प्रमाणावर जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, भाजपाला कमी जागा मिळवता आल्या. देशात एनडीएचे सरकार स्थापन झाले. नुकत्याच काही राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे. यामुळे मध्यमवर्गापासून ते उद्योजकांपर्यंत मोठ्या घोषणा केल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे. Union Budget 2025 |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूचक विधान
यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी केलेल्या सूचक विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. मोदींनी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी माध्यमांशी साधलेल्या संवादात लक्ष्मीमातेला नमस्कार करतो. आपल्या संस्कृतीत अशा प्रसंगी देवी लक्ष्मीचं स्मरण केलं जातं, तिला नमन केलं जातं. मी लक्ष्मीमातेकडे प्रार्थना करतो की देशातील गरीब व मध्यमवर्गावर तिची कृपादृष्टी राहो. त्यांनी केलेल्या या विधानाचा संबंध टॅक्ससोबत जोडला जात आहे. मूळात त्यांचे हे विधान खूप काही बोलून गेले आहे. त्यामुळे त्यांनी जनतेला दिलासा देणाऱ्या करसवलतींचे संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. Union Budget 2025 |
हेही वाचा:
अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी 3’ चित्रपटात दिसणार टीव्ही मालिकेतील लोकप्रिय अभिनेता





