पाटण : गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी आपल्या राजकीय धावपळीतून वेळ काढत नुकताच पाटण तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
महाराष्ट्राचे गृह व अर्थ राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे तब्बल पाच खात्यांचा पदभार आहे.
गृह व अर्थ सारखी संवेदनशील खात्यांचा कारभार सांभाळताना राज्यातील दररोज घडामोडीवर त्यांना लक्ष केंद्रित करावे लागत आहे. शिवाय तोंडावर असलेले राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन यामुळे सतत आपल्या कामांत व्यस्त असलेल्या ना. देसाई यांनी आपल्या व्यस्त शेड्युल मधून वेळ काढत नुकतीच पाटण मतदार संघातील गव्हाणवाडी-चोपदारवाडी या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
प्राथमिक शाळेतील बालकांशी संवाद साधतांना ना. देसाई यांनी विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारले. आणि विद्यार्थ्यांच्या उत्तरावर समाधान व्यक्त करून त्यांनी शाळेतील बालकांसाठी स्वतः खाऊचे वाटप केले.