मराठमोळी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी ‘स्कूल’मध्ये घेतलं अॅडमिशन; शिकत आहेत ‘ही’ गोष्ट

मराठी इंडस्ट्रीतील एव्हरग्रीन अभिनेत्री निवेदिता सराफ या आजही उत्साहाने सिनेमा आणि टेलिव्हिजन माध्यमात काम करताना दिसत आहेत. वयाच्या साठाव्या वर्षी देखील त्या त्याच जोमानं काम करताना दिसतात. एकीकडे अभिनय सुरु असताना निवेदिता सराफ यांनी स्कूलमध्ये अॅडमिशन घेतलं आहे. वयाच्या साठीत त्यांनी नव्या गोष्टीचं प्रशिक्षण सुरू केलं आहे. थेट व्हिडीओ शेअर करत त्यांनी याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.
‘ही’ गोष्ट शिकण्यासाठी स्कूलमध्ये घेतलं अॅडमिशन
निवेदिता सराफ यांनी त्यांची पाककलेची आवड पुढे नेण्याचं ठरवलं आहे. त्यांनी बेकरी प्रोडक्ट शिकायला सुरुवात केली आहे. त्यांनी स्कूल ऑफ युरोपियन पेस्ट्री येथे शिकायला सुरुवात केली आहे. शुटींगमधून वेळ काढून त्या शेफकडे वेगवेगळे बेकरी प्रोडक्ट शिकायला जात आहेत. नवे पदार्थ शिकण्यासाठी त्या प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यांनी याचा एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
मला जे आवडते ते शिकणे आणि आनंद घेणे, असं म्हणत निवेदिता सराफ यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या अगदी मन लावून शेफ जे सांगेत तसं काम करताना दिसत आहेत. वयाच्या साठीतही त्यांची ही शिकण्याची आवड पाहून सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.





