नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमारांची राजकारणात होणार एन्ट्री? आगामी निवडणुकांच्या दृष्टीने होणार सक्रिय?

Nitish Kumar | बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (युनायटेड) प्रमुख नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. निशांत कुमार हे होळीनंतर औपचारिकपणे राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू झाली आहे. निशांत कुमार या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पदार्पण करण्याच्या तयारीत असून, एनडीएसोबत निवडणूक लढवण्याची योजना आखल्याने एक मोठा बदल घडू शकतो.
भाजपचे मंत्री प्रेम कुमार यांनी निशांत कुमार यांचे राजकारणात येण्याचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, जर निशांत कुमार राजकारणात आला तर त्याचे स्वागत आहे. लोकशाही आहे, प्रत्येकाला राजकारणात प्रवेश करण्याचा अधिकार आहे. तो तरूण आहे, त्यांच्या आगमनानंतर, बिहारच्या विकासास गती मिळेल. राजकारणात प्रवेश करण्यासाठी त्यांचे स्वागत आहे.”
कोण आहे निशांत कुमार?
सीएम नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार 38 वर्षांचा आहे. राजकारण, टीव्ही आणि सोशल मीडियापासून ते दूर राहिले आहेत. निशांत कुमार हे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या दिवंगत पत्नी मंजू सिंह यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेतले आणि अभियांत्रिकीची पदवी घेतली. Nitish Kumar |
या महिन्याच्या सुरूवातीला 8 जानेवारी रोजी निशांत कुमार आपल्या गावी बख्तियरपूरबरोबर एका कार्यक्रमात वडिलांसोबत दिसले होते. त्या काळात, माध्यमांशी बोलताना त्यांनी बिहारमधील विधानसभा निवडणुकीत जेडीयूला विजयी करण्याचे आवाहन केले, जेणेकरून त्यांचे सरकार पुन्हा राज्यात स्थापन होईल. याआधी निशांत कुमार हे 2015 मध्ये वडिलांच्या शपथविधी समारंभात राजकीय कार्यक्रमात सहभागी झाले होते. मात्र, त्यांनी थेट राजकारणात येण्याची शक्यता नाकारली आणि मला राजकारणात रस नसून अध्यात्मिक मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. दरम्यान, नितीश कुमार हे बिहारचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत. मात्र त्यांचे पुत्र निशांत राजकारणापासून दुर आहेत. Nitish Kumar |
निशांत कुमार यांची पक्षाला का वाटली गरज ?
गेल्या एक वर्षापासून नितीश कुमार आरोग्याच्या संबधित अडचणींचा सामना करत आहेत. ज्यानंतर ते कमकुवत दिसू लागल्याने पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांवर दुसरा नेता निवडण्यासाठी दबाव आहे. पक्षाचे लोक एकमेकांना सहन करण्याच्या स्थितीत नाहीत, त्यामुळे वारसा सांभाळण्याचे सक्षम नेतृत्व रक्ताच्या नात्यातच दिसते. नितीश कुमार कमकुवत होताच सुरू होणारा सत्तासंघर्ष थांबवण्यासाठी निशांत कुमार जेडीयूमध्ये सर्वोत्कृष्ट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Nitish Kumar |
याशिवाय पक्षाच्या प्रमुखाचे रक्ताचे नाते असलेली व्यक्ती जेव्हा नेता बनते, तेव्हा सर्वच घटक पक्ष त्याचे अधीनता स्वीकारण्यास मागेपुढे पाहत नाहीत. यामुळेच घराणेशाही पक्षांमध्ये जेव्हा कुटुंबातील सदस्य पक्षाचे नेतृत्व करतात तेव्हा बंडखोरी किंवा संघर्षाची परिस्थिती तुलनेने कमी असते, असे पाहायला मिळाले आहे. Nitish Kumar |





