मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-जेडी(यु) यांच्या एनडीए आघाडीला काठावरचे बहुमत मिळाले. यंदाच्या निवडणुकांमध्ये एकीकडे भाजपच्या जागांमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळाले तर दुसरीकडे नितीश कुमारांची जेडी(यु) तिसऱ्या क्रमांकावर घसरली. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत असून राज्यातील नेते यावरून एकमेकांना लक्ष्य करत आहेत. अशातच आता शिवसेना नेते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांना एक सल्ला दिला आहे. कुमार यांनी बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवावा असं सामंत यांनी म्हंटल असून यासाठी नितीश कुमार यांनी शरद पवार यांचा सल्ला घ्यावा असंही सुचवलंय. ते टीव्ही ९ मराठी या नामांकित वृत्तवाहिनीशी बोलत होते. राणेंचं मोठं विधान; म्हणाले, ‘दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे…’ दरम्यान, यावेळी बोलताना सामंत यांनी बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप कशाप्रकारे प्रादेशिक पक्षांना संपवू पाहतोय हे संपूर्ण देशाने बघितल्याचा आरोप केला. बिहार विधानसभा निवडणुकांत सर्वात मोठा पक्ष ठरल्याबाबत त्यांनी राजदचे तरुण नेते तेजस्वी यादव यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना सामंत यांनी, “बिहारमध्ये सरकार स्थापन करताना नितीश कुमार यांनी शरद पवार यांचा सल्ला घेतला आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारखं खंबीर नेतृत्व केलं तर राज्यातील महाविकास आघाडीसारखा पॅटर्न बिहारमध्येही निर्माण होऊ शकतो” https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/supreme-court-slams-thackeray-government-over-bail-to-arnav-goswami/