नितीश कुमार यांच्या इफ्तार पार्टीवर मुस्लिम संघटनांचा बहिष्कार ; राजदने केले स्वागत

Nitish Kumar – Iftar Party । बिहारमध्ये नितीशकुमार यांना आगामी निवडणूक चांगल्याच जड जाणार असल्याचे दिसत आहे. कारण निवडणुकीच्या या वर्षात अल्पसंख्याक समुदायाने नितीश कुमार यांना मोठा धक्का दिला आहे. नितीश कुमार यांनी आज पाटणामध्ये आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीपासून मुस्लिम धार्मिक संघटना दूर राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. इमरत-ए-शरियाचे सरचिटणीस मुफ्ती सईदुर रहमान यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माहिती दिली.
बहिष्कारावर बोलताना मुफ्ती सईदुर रहमान यांनी, “आमच्या धार्मिक संघटना नितीश कुमार यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत सहभागी होणार नाहीत.” अशी घोषणा केली आहे. मुफ्ती सईदुर रहमान यांनी पुढे, “केंद्र सरकारने घेतलेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देण्याचा जेडीयूने घेतलेला निर्णय लक्षात घेता, आम्ही मुख्यमंत्र्यांच्या इफ्तार पार्टीवर बहिष्कार टाकला आहे.” असे स्पष्टीकरण देखील त्यांनी यावेळी दिले.
‘या’ संघटनांनी टाकला बहिष्कार Nitish Kumar – Iftar Party ।
इफ्तार पार्टीवर बहिष्कार टाकणाऱ्या संघटनांमध्ये इमरत शरिया, जमात इस्लामी, जमात अहले हदीस, खानकाह मोजिबिया, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, जमियत उलेमा-ए-हिंद आणि खानकाह रहमानी यांचा समावेश आहे. मुस्लिम संघटनांनी नितीश कुमार यांच्या इफ्तार पार्टीवर बहिष्कार टाकल्याचे लालू प्रसाद यादव यांच्या पक्ष राजदने स्वागत केले आहे.
याविषयी बोलताना ,”तुम्ही अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण केले जाईल अशा धर्मनिरपेक्ष (धर्मनिरपेक्ष) शासनाचे आश्वासन देऊन सत्तेत आलात. परंतु भाजपसोबत तुमचे युती करणे आणि असंवैधानिक आणि अतार्किक कायद्याला पाठिंबा देणे हे तुमच्या घोषित वचनबद्धतेच्या विरुद्ध आहे,” असा आरोप इमरत शरिया यांनी केला. या घडामोडीवर नितीश कुमार किंवा त्यांच्या पक्ष जेडी(यू) कडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
आरजेडीची पोस्ट Nitish Kumar – Iftar Party ।
राजदने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर लिहिले की, “नितीशच्या इफ्तार पार्टीवर बहिष्कार घालण्याचे स्वागत आहे. राजदने म्हटले आहे की, ‘वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणे ही अलीकडील बाब आहे. हे तेच नितीश आहे ज्यांनी सीएएला पाठिंबा दिला होता. ते तिहेरी तलाकवरही भाजपसोबत होते. याचा अर्थ असा की त्यांनी मुस्लिमांना उखडून टाकणाऱ्या सर्व काळ्या कायद्यांना पाठिंबा दिला. आता नितीशकुमार यांच्याशी असलेल्या निष्ठेमुळे मुस्लिम समुदायाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळांमध्ये बसलेल्या मुस्लिम नेत्यांवर आणि अध्यक्षांवरही बहिष्कार टाकला पाहिजे. नितीशकुमार कधीही राजकीय विश्वासाला पात्र राहिले नाहीत.” असे म्हणत त्यांनी आरोप केले आहेत.





