महागाईवरून नितीन राऊतांचा मोदी सरकारवर सणसणीत टोला ‘अच्छा सिला दिया तूने लोगों को मतों का….’

मुंबई – देशभरात आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. मात्र यासोबतच सर्वसामान्यांना महागाईला तोंड द्यावे लागणार आहे. कारण आजपासून एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर लागू झाले आहेत. यंदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 250 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आली आहे.
अच्छा सिला दिया तूने लोगों को मतों का…..#PetrolDieselPrice pic.twitter.com/uErdHsIR3n
— Dr. Nitin Raut 🇮🇳 (@NitinRaut_INC) April 1, 2022
मागील दोन महिन्यात आतापर्यंत 346 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. याच महागाईच्या मुद्यावरून राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे.
नितीन राऊत यांनी ट्विट केले आहे की,’अच्छा सिला दिया तूने लोगों को मतों का….. #PetrolDieselPrice’ असं ट्विट करत त्यांनी कार्टून सुद्धा शेअर केले आहे . यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा तबला वाजवतांना दिसत असून ‘धीरे-धीरे कीमतें बढाना है, हद से गुजर जाना है…’, असे ते म्हणतांना दिसत आहे.
दरम्यान,चार महिन्यांच्या कालावधीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. तर, घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरही या दरम्यान स्थिर होते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 22 मार्च रोजी 50 रुपयांनी दरवाढ करण्यात आली होती. देशातील अनेक शहरांमध्ये एलपीजी गॅसचे दर 950 च्या घरात पोहचले. तर, पाटणामध्ये 1000 रुपयांचा दर गाठला आहे.





