Nitin Nabin : उत्तर प्रदेशमध्ये भाजप मोठा विजय मिळवणार; नितीन नबीन यांनी व्यक्त केला विश्वास
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन (Nitin Nabin) यांनी रविवारी सांगितले की, पक्ष २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका आपल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए मित्रपक्षांसोबत लढेल. दुसरीकडे, भाजप स्वबळावर याच निवडणुका लढण्यास सक्षम आहे, असा दावाही त्यांनी केला.

Nitin Nabin : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन (Nitin Nabin) यांनी रविवारी सांगितले की, पक्ष २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका आपल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए मित्रपक्षांसोबत लढेल. दुसरीकडे, भाजप स्वबळावर याच निवडणुका लढण्यास सक्षम आहे, असा दावाही त्यांनी केला.
लखनौ येथील ताज हॉटेलमध्ये एनडीएच्या मित्रपक्षांना भेटल्यानंतर पत्रकारांशी बोलताना, नबीन (Nitin Nabin) यांनी विश्वास व्यक्त केला की २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत एनडीए निर्णायक जनादेशासह उत्तर प्रदेशात पुन्हा सत्तेवर येईल. भाजपा निवडणुका लढवण्यास सक्षम आहे. उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश बनवण्यासाठी एनडीएचे सर्व घटक पक्ष एकत्र काम करत राहतील, हे आम्ही सुनिश्चित करू.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशचे परिवर्तन घडवून आणल्याबद्दल नबीन (Nitin Nabin) यांनी एनडीए सरकारला श्रेय दिले. आमचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यांनी सेवेच्या भावनेने लोकांसाठी काम केले आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडी प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल, असे नबीन म्हणाले.






