मंचर : थोरांदळे (ता.आंबेगाव) येथील नितीन मारुती मिंडे यांना अमेरिका येथे जागतिक विमा परिषदेमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा बहुमान प्राप्त झाल्याची माहिती नारायणगाव शाखेची शाखा अधिकारी सुधीर कांत यांनी दिली. नितीन मिंडे हे ग्रामीण भागात विम्याचा प्रचार व प्रसार करण्यात अग्रेसर भूमिका बजावत आहेत. त्यामुळे त्यांचे शाखा अधिकारी सुधीर कांत व सह शाखा अधिकारी आनंद ठाकूर व विकास अधिकारी रघुनाथ काकडे यांनी अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला आहे. यावेळी नितीन मिंडे यांची पत्नी सोनल मिंडे आदी मान्यवर उपस्थित होते.