नितीन गडकरींनी घेतला शिवसेनेच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद; चर्चांना उधाण

मुंबई – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतला.
नितीन गडकरी आणि मनोहर जोशी यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतु, नितीन गडकरी यांनी जोशींची सदिच्छा भेट घेतले असल्याचे सांगितले आहे.
केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी सरांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/LzFqht77uZ
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) January 7, 2021
दरम्यान, नितीन गडकरी १९९५ ते १९९९ सालापर्यंत मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मनोहर जोशींच्या कार्यकाळात नितीन गडकरी यांनी मुंबईमध्ये ५५ फ्लायओव्हर आणि पुणे-मुंबई महामार्ग, वरळी सी लिंक, कोस्टल रोड, ट्रान्सहार्बर बांधले होते.





