“दिल्लीत तीन दिवस राहिल्याने संसर्ग..” ; दिल्लीतल्या प्रदूषणावर नितीन गडकरींचे धक्कदायक विधान

Nitin Gadkari on Delhi Pollution । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीतील प्रदूषणावर चिंता व्यक्त केली आहे. याविषयी,”दिल्लीतील प्रदूषणाची पातळी इतकी जास्त आहे की तीन दिवस शहरात राहिल्याने संसर्ग होऊ शकतो.” असे धक्कादायक विधान देखील त्यांनी केले आहे. प्रदूषणाच्या पातळीमुळे दिल्ली आणि मुंबई रेड झोनमध्ये असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. तसेच “येत्या काळात हवा आणि जल प्रदूषणाबाबत बरेच काम करण्याची गरज आहे.” असेही आवाहन त्यांनी यावेळी दिले.
एका वृत्तसंस्थेनुसार, नितीन गडकरी यांनी, “दिल्लीमध्ये प्रदूषण खूप जास्त आहे, जर तुम्ही तीन दिवस दिल्लीत राहिलात तर तुम्हाला नक्कीच काही संसर्ग होईल. एका वैद्यकीय अहवालानुसार, दिल्लीतील प्रदूषणामुळे नागरिकाचे सरासरी आयुष्य १० वर्षांनी कमी होत आहे.”असे सांगितले.
प्रदूषणाबद्दल दिल्ली सरकार काय म्हणते?Nitin Gadkari on Delhi Pollution ।
अलीकडेच, दिल्ली विधानसभेत, मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी ‘वाहनांमधून होणारे वायू प्रदूषण रोखणे’ या विषयावरील नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) अहवाल सादर केला, ज्यामध्ये अनेक कमतरता अधोरेखित करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या १४ कॅग अहवालांपैकी हा एक होता. दारू उत्पादन शुल्क धोरण आणि आरोग्य यासह तीन अहवाल आधीच सादर केले गेले आहेत.
अहवालातील डेटामध्ये संभाव्य त्रुटी Nitin Gadkari on Delhi Pollution ।
या अहवालात प्रदूषण नियंत्रण यंत्रणेतील अनेक कमतरता अधोरेखित करण्यात आल्या आहेत. यामध्ये कारसह अनेक वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्रे देण्यातील अनियमितता, अविश्वसनीय हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण प्रणाली आणि प्रदूषण नियंत्रण उपायांची कमकुवत अंमलबजावणी यांचा समावेश आहे. अहवालात हवेच्या गुणवत्तेच्या देखरेखी केंद्रांद्वारे तयार केलेल्या डेटामध्ये संभाव्य त्रुटी, प्रदूषण नियंत्रण स्रोतांबद्दल रिअल-टाइम माहितीचा अभाव आणि सार्वजनिक वाहतूक बसेसची कमतरता यांचाही उल्लेख आहे.
अहवालात म्हटले आहे की, राष्ट्रीय राजधानीत वाहनांमधून होणारे उत्सर्जन प्रदूषणाचे एक प्रमुख स्रोत असले तरी, सतत वातावरणीय हवा गुणवत्ता देखरेख केंद्रे (CAAQMS) ची ठिकाणे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आवश्यकता पूर्ण करत नाहीत, ज्यामुळे त्यांनी तयार केलेल्या डेटामध्ये संभाव्य चुका असल्याचे दिसून येते, ज्यामुळे AQI मूल्ये अविश्वसनीय बनतात.
हेही वाचा
रॉबर्ट वढेरा यांना ईडीचे समन्स ; चौकशीसाठी निघाले चालत, म्हणाले,” माझ्यावर दबाव…”





