Nitin Gadkari : “संपूर्ण देशाची कधीही भरून न निघणारी हानी ” ; अजित पवारांच्या निधनाने नितीन गडकरीही हळहळले
Nitin Gadkari :

Nitin Gadkari : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आहे. बारामती येथे विमान लँडिंग होत असताना विमानाचा अपघात झाला. या अपघातात हे विमान जळून खाक झाले. परिणामी या विमानात असलेले सहा प्रवासी यांचा करुण अंत झाला.
अजित पवारांच्या अशा अकाली जाण्याने महाराष्ट्रातून आता हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यातच देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील अजित पवारांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.
नितीन गडकरी यांनी अजित पवारांच्या निधनानंतर सोशल मोईडियावर एक पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. Nitin Gadkari :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जी यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक, दुर्दैवी आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. गेली अनेक वर्षं राज्याच्या विधिमंडळात सोबत काम करताना अजितदादांशी अतिशय जवळचा संबंध राहिला आहे. त्यांचे प्रशासनिक कौशल्य, विकासात्मक…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 28, 2026
यामध्ये त्यांनी “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जी यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक, दुर्दैवी आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. गेली अनेक वर्षं राज्याच्या विधिमंडळात सोबत काम करताना अजितदादांशी अतिशय जवळचा संबंध राहिला आहे.
त्यांचे प्रशासनिक कौशल्य, विकासात्मक दृष्टिकोन आणि लोकांना जोडण्याची हातोटी यांमुळे अजितदादांचे कायमच महाराष्ट्राच्या राजकारणात एक अढळ स्थान राहिले आहे.Nitin Gadkari :
महाराष्ट्राच्या विकासाची आकांक्षा असलेल्या या लोकनेत्याचे अकाली निधन होणे, ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची कधीही भरून न निघणारी हानी आहे. या दुःखद प्रसंगी संपूर्ण पवार कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो. ॐ शांती” असे म्हटले आहे.





