मुंबई : राज्याचे मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी फक्त हिंदू धर्मीय झटका मटण आणि चिकन विक्रेत्यांच्या नोंदणीसाठी मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम नावाचे पोर्टल सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका संविधानिक पदावरील व्यक्तीने एकाच धर्माच्या लोकांकडून मटण खरेदी करण्याचे आवाहन करणे योग्य की अयोग्य असा प्रश्न उपस्थित झालेले असताना रामदास आठवले यांनी नितेश राणेंना मटण झटका असो की हलाल आपल्याला मटण खायला मिळायला पाहिजे. नितेश राणेंनी एवढी हार्ड भूमिका घेऊ नये असा सल्ला त्यांनी दिला आहे. नितेश राणेंना रामदास आठवलेंचा प्रेमळ सल्ला मटण झटका असो वा हलाल आपल्याला मटण खायला मिळायला पाहिजे. झटक्याने करा अगर पटक्याने करा. पण नितेश राणेंनी एवढी हार्ड भूमिका घेऊ नका, असा सल्ला देखील आठवले यांनी दिला. मुसलमान आता हा देश सोडून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे सर्वधर्म समभाव संविधान निर्माण झाले आहे, त्याचा विचार करता मी नितेश राणे यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैन्य नव्हते या नितेश राणेंच्या वक्तव्यावर देखील रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले नितेश राणे यांचं म्हणणं अत्यंत चुकीचे, त्यावेळी नितेश राणे ही नव्हते आणि मीही नव्हतो. इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचे प्रमुख हे मुस्लिम होते असे पुरावे पुढे आलेले आहेत. अनेक शूर मुसलमान हे मुघलांच्या विरोधात लढलेले आहेत आणि हाच इतिहास असल्याचे आठवले यांनी सांगितल आहे. लोकसभेत स्वत:हून पराभूत झालो, असा माझ्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे मला मंत्रिपद दिलं नसल्याचा गौप्यस्फोट सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत खरंतर त्यांना मंत्री करायला हवं होते. पण आता एकच मंत्रिपद राहिले असल्याने दलितांचा मतांचा विचार करता त्या ठिकाणी आमच्या पक्षाचा मंत्री करा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. पुढे रामदास आठवले म्हणाले की, ‘प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना लोकांनी जास्त वाचू नये. जास्त वाचले की डोक्यावर परिणाम होतो. त्यामुळे वाद निर्माण होतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील टीका ही चुकीची आणि मूर्खपणाची आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा काँग्रेस पक्षाने लपवून ठेवला. काँग्रेसकडून शिवरायांची बदनामी करण्याचं षडयंत्र सुरू असल्याची टीका मंत्री शिवेंद्रसिहराजे यांनी केली होती, हे म्हणणे योग्यच असल्याचं आठवलेंनी सांगितलं. त्यामुळे त्यांच्या मताशी मी सहमत आहे. छावा चित्रपटातून हा इतिहास आता पुढे येतो आहे. मल्हार प्रमाणपत्र म्हणजे काय? मल्हार प्रमाणन हे एक नवीनच सुरू झालेले झटका मांस पुरवठादार पडताळणी व्यासपीठ आहे. जे मांस हिंदू धार्मिक परंपरेनुसार मिळवले जाते आणि प्रक्रिया केले जाते याची खात्री करते. अधिकृत MalharCertification.com वेबसाइटनुसार, हे प्रमाणपत्र केवळ हिंदू खटिक समुदायातील विक्रेत्यांसाठी उपलब्ध आहे. हलाल मटण म्हणजे काय? – इस्लाममध्ये फक्त हलाल मांसाला परवानगी. – इस्लामनुसार फक्त वैध मार्गाने कत्तल केलेले प्राणी खाऊ शकतात. – चाकूने जनावराच्या मानेची नस आणि श्वासोच्छवासाची नळी कापली जाते. – यावेळी प्रार्थना देखील केली जाते. – संपूर्ण रक्त बाहेर पडण्याची वाट पाहिली जाते. – ज्यासाठी प्राणी जिवंत आणि निरोगी असणे देखील आवश्यक. झटका मटण म्हणजे काय? – धारदार शस्त्राने प्राण्याची मान एका झटक्यात धडापासून वेगळी करणे. – झटक्यामुळे प्राण्याला जास्त वेदना होत नाहीत असा समज आहे.