नितेश राणेंनी व्हिडीओ शेअर करत सरकारच्या ‘या’ निर्णयाची उडवली खिल्ली
Updated On:

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यातच अर्थ चक्राला गती देण्यासाठी मिशन बिगिन अगेन अर्थात पुनश्च: हरिओमचा नारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनलॉक १ च्या वेळी दिला होता. तसंच रविवारी झालेल्या भाषणातही त्यांनी मिशन बिगिन अगेनचा उल्लेख केला. मात्र ठाकरे सरकारला या वाक्यावरुन आरसा दाखवण्याचं काम भाजपा नेते नितेश राणे यांनी केले आहे.
Mission begin again !!! pic.twitter.com/IH7clFeFpP
— nitesh rane (@NiteshNRane) June 29, 2020
मिशन बिगिन अगेन एवढ्याच ओळी लिहित त्यांनी मुंबईतल्या मुलुंड टोल नाक्यावर झालेल्या वाहतूक कोंडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ठाकरे सरकारच्या मिशन बिगिन अगेनची नितेश राणे यांनी खिल्ली उडवली आहे.





