Nishikant Dubey : भारतीय जनता पार्टीचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसांबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत निशेष नोंदवला होता. आता त्या वक्तव्याप्रकरणी दुबेंच्या अडचणी वाढल्या आहेत. येत्या 7 एप्रिलला निशिकांत दुबे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दुबे न्यायालयात हजर राहतात का हे पाहणे महत्वाचे असणार आहे. नेमकं काय म्हणाले होते निशिकांत दुबे? Nishikant Dubey निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाला पटक-पटक के मारेंगे असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी जोरदार टीका करण्यात आली होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना कडक इशारा देत निशिकांत दुबे जर महाराष्ट्रात आले, तर त्यांना इथे ‘डुबा-डुबा के मारेंगे’, असे प्रत्युत्तर दिले होते. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. निशिकांत दुबे यांनी आपल्या वक्तव्यामधून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. यानंतर दोन्ही पक्षाकडून दुबेंच्या वक्तव्याचा जोरदार निषेध नोंदवण्यात आला होता. Nishikant Dubey : ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी निशिकांत दुबेंच्या अडचणीत वाढ; न्यायालयात हजर राहण्याचे आदेश मनसेनकडून केवळ शाब्दिक युद्ध न थांबवता या प्रकरणाचा पाठपुरावा न्यायालयीन स्तरावर करण्यात आला. मनसेचे नाशिक शहर प्रमुख सुदाम कोंबडे यांनी निशिकांत दुबे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी 7 एप्रिल रोजी पार पडणार आहे. सुनावणीला निशिकांत दुबे यांनी स्वतः हजर राहण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मनसे नेते सुदाम कोंबडे यांनी याचिका दाखल करताना निशिकांत दुबे यांना इशारा दिला होता. निशिकांत दुबे सातत्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा अपमान करत आहेत. आता आम्ही दुबेला दाखवू की, कसे पटक पटक के मारते हैं. तू नाशिकला ये. त्यांना समजतच नाही की, संपूर्ण देशाची महाराष्ट्र ही आर्थिक राजधानी आहे. हा माणूस खासदार असला तरी त्यांना अभ्यास कमी आहे. म्हणून दुबे, तुला धडा शिकवावा लागेल. तू नक्की नाशिकला ये, असा इशारा कोंबडे यांनी दिला आहे. हेही वाचा : Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; खडसेंसह मुलीवर गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण?