#NisargaCyclone: रत्नागिरीच्या मिरया बीचवर उसळल्या मोठ्या लाटा
Updated On:

रत्नागिरी: राज्यात दुसरं एक मोठं संकट येऊन ठेपलं आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळान आता रौद्र रूप धारण केलं असून थोड्याच वेळात ते किनारपट्टीवर धडकणार आहे. रत्नागिरीच्या मिरया बीचवर समुद्रात मोठ मोठ्या लाटा उसळल्या आहेत. राज्यात इतर ठिकाणी देखील जोरदार पाऊस सुरु आहे.
तसेच, अरबी समुद्रात असलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे वाऱ्याला खेचून आणल्याने मान्सून नियमित वेळेवर एक जून रोजी केरळ मध्ये दाखल झाला आहे. मान्सूनने सोमवारी केरळच्या कन्नूर व तामिळनाडूच्या कोईमतून कन्याकुमारीपर्यतचा भाग व्यापला. हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत जाताना किनारपट्टीलगत मान्सूनची आणखी वाटचाल होण्याची शक्यता आहे. केरळाचा संपुर्ण भाग व्यापून मान्सून आता कर्नाटकात दाखल होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा सहा ते सात जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.





