अर्थसंकल्पात महिलांसाठी करण्यात आल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा ; महिला उद्योजकांना देणार चालना

Nirmala Sitharaman । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी, सर्वसमावेशक विकास, लोकांच्या भावना आणि मध्यमवर्गीयांच्या आकांक्षांना न्याय देण्याच्यादृष्टीने यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तसेच त्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा देखील केल्या आहेत.
कृषी, लघू मध्य उद्योग, गुंतवणूक आणि निर्यात ही विकासाची चार इंजिन्स असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. दरम्यान महिलांसाठी अर्थसंकल्पात खालील महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
महिलांसाठी करण्यात आलेल्या महत्वाच्या घोषणा Nirmala Sitharaman ।
* दोन कोटी रुपयांचा मध्यम मुदतीचे कर्ज नव्याने लघुउद्योजक महिलांना देण्यात येणार आहे.
* महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणार
* मागास वर्गातील महिलांसाठी नवी योजना, चामड्यांची पादत्राणे बनवणाऱ्यांसाठी ही योजना असून पाच लाख महिलांना योजनेचा लाभ होणार
* महिलांना स्टार्टअप साठी दोन कोटी रुपयांची मदत
* इंडिया पोस्ट महिला बँकेचे पुनरुज्जीवन करणार
* सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजना- आठ कोटीहून अधिक लहान मुलांना पोषणमूल्य मिळणार
* स्टार्टअप्ससाठी ₹10,000कोटींची तरतूद
* एससी/एसटी महिलांना स्टार्टअप्ससाठी कर्ज स्वरूपात मदत
* देशभरातील एक कोटी गर्भवती आणि स्तनदा मातांना, एक लाख किशोरवयीन मुलींना पोषणमूल्य वाढवणार (आकांक्षीत जिल्हे- aspirational district) ईशान्य भारतातही विशेष लक्ष
पोषण मुल्य पुरवण्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद Nirmala Sitharaman ।
सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 कार्यक्रमांतर्गत 8 कोटी लहान मुलांना सकस अन्न पुरवणार. 1 कोटी महिलांना आणि 20 लाख कुपोषित मुलींना सकस अन्न पुरवण्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करणार. सरकारी शाळांमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन पुरवणार. एससी एसटी महिलांसाठी नव्या योजनेची घोषणा करण्यात आलीय. यासाठी 5 वर्षांसाठी ही योजना असणार आहे. एसएसी, एसटी प्रवर्गातील महिलांना या योजनेतून मदत मिळणार आहे. 5 लाख महिलांना याचा लाभ होईल. यासाठी 10 हजार कोटींचा नवा निधी दिला जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं जाणार आहे. यासाठी 5 लाख महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे.





