पिंपरी | भाजपा महिला मोर्चा अध्यक्षपदी निर्मला पोटे

तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे शहर स्टेशन विभाग भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निर्मला पोटे यांची नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीचे पत्र खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले.
तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयामध्ये हा कार्यक्रम झाला. या वेळी शहराध्यक्ष अशोक दाभाडे, माजी नगरसेवक संतोष दाभाडे पाटील, रजनी ठाकूर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर, माजी नगरसेविका शोभा भेगडे, कल्पना भोपळे, श्रीराम कुबेर, नितीन पोटे,
अरुण भेगडे, वैभव कोतुळकर, तनुजा दाभाडे, स्वप्नील भेगडे, वंदना दाभाडे, संध्या जाधव, स्मिता पोरे, मृदुला भावे, किर्ती लोणकर,पौर्णिमा उपाध्याय, अनिता भेगडे, सविता पालवे, निलम भेगडे, संजोक्ता आगळे, हेमा इंदुलकर, पुष्पा पाठक, सचिन जाधव, निर्मल ओसवाल,
अमित जाधव, सागर शर्मा, अनिल वेदपाठक,विनोद उपाध्याय, सतीश पारगे, सुधाकर धनशेट्टी, विशाल जव्हेरी, अमरीश कुमार, राजेंद्र डांगे, गजानन राजहंस, तसेच राजमाता महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या. पक्ष संघटना बांधणीसाठी भविष्यात जोमाने काम करणार असल्याचे मत निर्मला पोटे यांनी व्यक्त केले.





