Nirmal Purja : प्रसिद्ध गिर्यारोहक निर्मल पुरजा यांचे निधन
पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या गिलगिट बाल्टिस्तानमधील ब्रॉड पीकवर झालेल्या हिमस्खलनात नेपाळचे ज्येष्ठ गिर्यारोहक निर्मल पुरजा (Nirmal Purja) यांचे निधन झाले, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी शनिवारी दिले.

Nirmal Purja : पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या गिलगिट बाल्टिस्तानमधील ब्रॉड पीकवर झालेल्या हिमस्खलनात नेपाळचे ज्येष्ठ गिर्यारोहक निर्मल पुरजा (Nirmal Purja) यांचे निधन झाले, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी शनिवारी दिले. नेपाळचे ४३ वर्षीय पुरजा हे १० गिर्यारोहकांच्या गटाचा भाग होते.
गुरुवारी अचानक झालेल्या हिमस्खलनामुळे हे सर्व गिर्यारोहक बेपत्ता झाले होते. त्यानंतर घेतलेल्या शोधादरम्यान एका नेपाळी गिर्यारोहकासह तीन मृतदेहांची ओळख पटली असून ऐज पुन्हा शोधमोहीम सुरू केल्यावर पर्वतावर (Nirmal Purja) इतर सहा मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती नेपाळ गिर्यारोहण संघटनेच्या एका अधिकाऱ्याने दिली. शनिवारी एलिट एक्सपेडिशनने सोशल मीडियावरच्या एका निवेदनाद्वारे पुरजा यांच्या मृत्यूला दुजोरा दिला.
के-२ जवळ काराकोरम पर्वतरांगेत असलेले ब्रॉड पीक (८,०५१ मीटर) हे जगातील १२ वे सर्वात उंच शिखर असून, ते चढाईसाठी सर्वात आव्हानात्मक शिखरांपैकी एक मानले जाते. गुरुवारी सुमारे ७,००० मीटर उंचीवर पर्वतावर हिमस्खलन झाले, त्यात शिखर सर करण्यासाठी निघालेला १० सदस्यीय गिर्यारोहक गट वाहून गेला होता.
गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हिमस्खलनानंतर (Nirmal Purja) नेपाळचे सहा, एक पाकिस्तानी, एक ओमानचा, एक अमेरिकन आणि एक चिनी असे गिर्यारोहक बेपत्ता झाले होते, असे अल्पाइन क्लब ऑफ पाकिस्तानने म्हटले होते.






