निर्भया बलात्कार: चारही आरोपीना फाशी देण्याची तयारी सुरू

नवी दिल्ली : आता तिहारमध्ये एकाच वेळी 4 कैद्यांना फाशी दिली जाऊ शकते. तिहारमध्ये फक्त एकावेळी एकाच आरोपीला फाशी देता येत होती. परंतु आता चार आरोपीना एकसोबत फाशी देता येईल. पीडब्ल्यूडीने सोमवारी आणखी तीन तख्त तयार केले आहे. हे देशातील पहिले कारागृह आहे जिथे एकाच वेळी चार आरोपीना फाशी देता येईल.
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपीना फाशी देण्यासाठी तीन नवीन तख्त निर्माण केल्याचे जेल सूत्रांचे म्हणणे आहे. जेल प्रशासन या चारही आरोपीचा अहवाल न्यायालयात सादर करणार आहेत. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच फाशी देण्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल.
निर्भया सामूहिक बलात्काराच्या चार आरोपीना तिहार प्रशासनाने जेल क्रमांक 2 आणि 4 मध्ये ठेवले आहे. त्यांना फाशी देण्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोर्टाकडून ब्लॅक वॉरंट काढण्यात येईल. त्यानंतर चौघांनाही कारागृह क्र 3 मध्ये फाशी जवळच्या कक्षात हलविण्यात येईल.




