बुनोस आयर्स
अर्जेंटिना मधील एका कुटुंबाने एका आगळ्यावेगळ्या विक्रमाची नोंद केली आहे त्यांच्या मालकीच्या 90 वर्षे जुन्या एका मोटारीच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण जगाची सफर पूर्ण केली आहे यासाठी गेली बावीस वर्षे हे कुटुंब सतत प्रवास करत होते या बावीस वर्षांच्या कालावधीमध्ये जगातील पाच खंडामधील बहुतेक देशांची सफर त्यांनी पूर्ण केली 2000मध्ये या कुटुंबाने या जगाच्या सफरीला सुरुवात केली होती.
2022 मध्ये या कुटुंबाची ही सफर पूर्ण झाली हरमन आणि केंडलहरिया अशी या कुटुंबातील प्रमुखांची नावे असून या पती-पत्नीला या 22 वर्षांच्या प्रवासाच्या कालावधीमध्ये चार मुलेही झाली या मुलांसह त्यांनी जगाचा संपूर्ण प्रवास पूर्ण केला 25 जानेवारी 2000 रोजी या कुटुंबाने जागतिक प्रवासाला सुरुवात केली गेल्या बावीस वर्षांच्या कालावधीमध्ये या कुटुंबाने तब्बल तीन लाख 62 हजार किलोमीटरचे अंतर पार केले आहे सध्या हे कुटुंब उरुग्वेमध्ये असून लवकरच अर्जेंटिनामध्ये प्रवेश करणार आहे.
देशाच्या राजधानी शहरातील ओबेलिक्स स्मारकाजवळ जाऊन हे कुटुंब आपल्या या जागतिक विक्रमाची समाप्ती करणार आहे या 22 वर्षांच्या कालावधीत या कुटुंबाने जगातील 102 देशांचा प्रवास केला जेव्हा हरमनने या प्रवासाला सुरुवात केली तेव्हा त्याचे वय एकोणतीस होते आता तो त्रेपन्न वर्षाचा झाला असून हा विक्रम पूर्ण झाल्यानंतर त्याला याच प्रकारे आता समुद्रमार्गे जागतिक सफर करण्याची इच्छा आहे.
त्याच्या विक्रमाची सुरुवात आलासका येथून झाली होती मित्राने गिफ्ट म्हणून दिलेल्या 1928 मॉडेलच्या एका अमेरिकन वाहनातून त्यांनी हा प्रवास सुरु केला बावीस वर्षांच्या प्रवासाचा कालावधीत या वाहनांचे टायर त्यांना आठ वेळा बदलावे लागले या निमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या लोकांशी संपर्क साधता आला आणि माणुसकीचा अनुभव घेता आला असे या दाम्पत्याने म्हटले आहे.