Nirmit Sawant : नऊवारी साडी, हातात बंदूक…, अभिनेत्री निर्मिती सावंत पुन्हा एकदा सासूच्या भूमिकेत
Nirmit Sawant : निर्मिती सावंत यांच्या नव्या सिनेमाचे नाव 'सुपर डुपर' असे असून यात अभिनेता ललित प्रभाकर देखील नवीन भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Nirmit Sawant : अभिनेत्री निर्मिती सावंत पुन्हा एकदा सासूबाईच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. नाटक, मालिका आणि सिनेमांच्या माध्यातून त्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. अलीकडेच त्यांचा ‘अगं अगं सुनबाई काय म्हणता काय सासूबाई’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
यातील त्यांच्या भूमिकेचे चाहत्यांकडून मोठे कौतुक करण्यात आले. त्यानंतर आता निर्मिती सावंत पुन्हा एकदा सासूच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मिती सावंत यांच्या नव्या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.
‘सुपर डुपर’ असं या सिनेमाचं नाव असून यात अभिनेता ललित प्रभाकर देखील नवीन भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. टीझरमध्ये अभिनेत्री निर्मिती सावंत डॅशिंग रोलमध्ये दिसत आहेत. त्यांनी नऊवारी साडी नेसली आहे. नाकात नथ आणि डोळ्यांवर काळा चष्मा लावला आहे.
सोबतच हातात फायरिंग गन दिसत आहे. शेवटी टेलिव्हिजनचा हँडसम अभिनेता ललित प्रभाकर देखील कडक लुकमध्ये एन्ट्री घेताना दिसतोय. येत्या 3 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
Breastfeeding: स्तनपान का आवश्यक? आई आणि बाळाच्या आरोग्याचं मजबूत नातं
या टिझरमधून चित्रपटात निर्मिती सावंत, ललित प्रभाकर यांच्यासह शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते आणि विदुला चौगुले ही कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. बऱ्याच दिवसांनंतर विदुला नवीन कलाकृतीतून तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. Nirmit Sawant
तसेच या चित्रपटातून पहिल्यांदाच ललित व विदुला एकत्र काम करत असल्याने या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहणं रंजक ठरू शकते. Nirmit Sawant
हेही वाचा:





