सातारा – बोरगाव हद्दीतील नऊ गुंड तडीपार

नागठाणे – रोजी मतदान होत असलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील नऊ जणांना तडीपार करण्याचे आदेश सातारचे तहसिलदार नागेश गायकवाड यांनी पारित केले आहेत. या बाबतचा प्रस्ताव बोरगावचे सपोनि रविंद्र तेलतुंबडे यांनी पाठवला होता.
वैभव मोहन निमज (रा. कुमठे), अविनाश अरविंद साळुंखे (रा. नागठाणे), रमेश भिकु पवार, उषा गजानन माने (रा. वेणेगाव), अंकुश शिवाजी सावेकर, अविनाश धनाजी चव्हाण (रा. अतित), हरिदास रामचंद्र राठोड (रा. अपशिंगे), सुनिल गुलाब शिंदे (रा वर्णे), शिवाजी गुजाबा यादव (रा. सासपडे) या नऊ जणांविरूद्घ तेलतुंबडे यांनी प्रस्ताव पाठवला होता.
त्या अनुशंगाने तहसिलदार सातारा यांनी दि. ४ ते मतदानाचा दि. ७ रोजी पर्यंत पोलीस ठाणे हद्दीतून तडीपार करण्याचे आदेश पारित केले आहेत. मात्र दि. ७ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेस हजर राहुन मतदान करण्यास परवानगी दिली असून मतदान झाल्यानंतर पुन्हा मनाई क्षेत्राबाहेर जाण्याचे आदेशही दिले आहेत.





