अजित पवार तुमच्यात हिम्मत असेल तर…, निलेश राणेंची खरमरीत टीका

मुंबई – हिंगोलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी गंभीर चुक केली आहे. नवघरे हे महाराजांना हार घालण्यासाठी घोड्यावर चढले व महाराजांना पुष्पहार अर्पण केला. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यावरून राजकीय वर्तुळात मोठा वादंग निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार राजू नवघरे या हारामखोरला भर चौकात फटके टाकले पाहिजे. राष्ट्रवादीवाल्याना मस्ती आली आहे, यांची जिरवल्या शिवाय पर्याय नाही. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिम्मत असेल तर ह्याची पक्षातून हकालपट्टी करा. औरंगजेबच्या औलादी आहेत ह्या पक्षात. pic.twitter.com/nf3AyNJR6P
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 14, 2021
या प्रकरणावरून भाजपनेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला आहे. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिम्मत असेल तर आमदार नवघरे यांची पक्षातून हकालपट्टी करा, असे आव्हान त्यांनी यावेळी केले आहे.
निलेश राणे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार राजू नवघरे यांना भर चौकात फटके टाकले पाहिजे. या पक्षात सारे औरंगजेबासारखे आहेत. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिम्मत असेल तर ह्याची पक्षातून हकालपट्टी करा. असे खरमरीत ट्वीट त्यांनी केले आहे.





