निलेश राणेंकडून शरद पवारांची ‘औरंगजेबा’शी तुलना; राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

मुंबई : भाजपाचे नेते निलेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना औरंगजेब म्हणत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यानंतर आता त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत असल्याचे दिसत आहे. राज्यभरातून निलेश राणेंवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवा
र यांच्याविषयी ट्विट करत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांनी एक ट्विट करत, “निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात, कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार.” असे म्हटले होते. त्यांनी केलेल्या याच वादग्रस्त वक्तव्यामुळे राजभरातुन तसेच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमट आहेत.
त्यासोबतच निलेश राणे यांनी आणखी एक ट्विट करत,’पवार साहेब आधी औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादला धाराशिव आणि अहमदनगरला अहील्यानगर ही नावं तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला मान्य आहे हे म्हणून ट्विट किव्हा स्टेटमेंट जाहीर करा. आम्ही तुमचं अभिनंदन करू. ‘असेदेखील त्यांनी म्हटले.





