यानंतर भाजप आमदार नितेश राणेंनी हाच फोटो घेऊन वादग्रस्त मजकूर ट्विट केला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “त्यांचे नेते उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या उमेदवाराला यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे. मग संजय राऊत विरोधकांच्या बैठकीला काय करत आहेत ? आपल्या मालकाचा इमानदार पाळीव प्राणी ! अजूनही वेळ गेलेली नाही उद्धवजी”, अशा आशयाचे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.
\n
\n

\n“मॅच हरल्यानंतर प्लेअर ड्रेसिंग रुम” अस कॅप्शन देत नितेश राणेंचे बंधू निलेश राणे यांनी पवारांच्या बैठकीचा फोटो शेअर केलाय.