निकिता पोरवालने पटकावला यंदाचा ‘फेमिना मिस इंडिया’चा किताब

Femina Miss India 2024 | मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील रहिवासी असलेल्या निकिता पोरवालने यंदाचा मिस इंडिया वर्ल्ड 2024 (Miss India World 2024) चा किताब पटकावला आहे. ही स्पर्धा 16 ऑक्टोबरच्या रात्री मुंबईतील महालक्ष्मी येथील प्रसिद्ध स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आली होती. या सौंदर्यस्पर्धेत रेखा पांडे ही फर्स्ट रनर अप तर आयुषी ढोलकिया सेकंड रनर अप ठरली.
या स्पर्धेत दिल्लीसह 30 विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. निकिताने टीव्ही अँकर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. निकिताने नाटक आणि चित्रपटातही काम केलं आहे. अभिनयाव्यतिरिक्त निकिताला वाचन, लेखन, चित्रकला आणि चित्रपट पाहण्याची आवड आहे.
View this post on Instagram
तिने बडोदाच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातून पदवी मिळवली आहे. त्यांनी बॅचलर ऑफ परफॉर्मिंगचे शिक्षण घेतले आहे. तिने ‘कृष्ण लीला’ हे 250 पानी नाटकसुद्धा लिहिलं आहे. तिने एका चित्रपटातही काम केलं असून तो चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये दाखवला आहे. Femina Miss India 2024 |
आता ‘मिस इंडिया वर्ल्ड’ चा किताब जिंकल्यानंतर आता निकिता ‘मिस वर्ल्ड’ या सौंदर्यस्पर्धेसाठी तयारी करणार आहे.1994 मध्ये ऐश्वर्या राय, 1997 मध्ये डायना हेडन, 1999 मध्ये युक्ता मुखी, 2000 मध्ये प्रियंका चोप्रा आणि 2017 मध्ये मानुषी छिल्लर यांनी मिस वर्ल्डचा किताब पटकावला आहे. Femina Miss India 2024 |
हेही वाचा:
शेअर बाजारात घसरण ; बजाज ऑटोच्या 7 टक्के मंदीमुळे ऑटो इंडेक्स 2 टक्क्यांनी घसरला

